गाथा वीर हिंदू योद्धांची कार्यक्रम ३१ मार्च रोजी आयोजन

नंदुरबार:  हिंदु सेवा सहाय्य समिती आयोजित ‘गाथा वीर हिंदू योद्धांची’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवार ३१ मार्च रोजी डॉ काणे गर्ल्स हायस्कूल मैदानावर सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. प्रमुख वक्ते म्हणून श्री राजा महाराज शेंडे, हिंगणघाट उपस्थित राहून ते सत्य इतिहासावर प्रकाशझोत टाकणार आहेत.
    शिवजयंती आणि वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह या दोन हिंदू वीर योद्धांची हिंदु धर्मासाठी केलेल्या त्यागाची यशोगाथा या कार्यक्रमाचा माध्यमातून मांडली जाणार आहे. इतिहासाची मोडतोड करून असत्य आणि खोटा इतिहास बऱ्याचवेळा मांडला जातो, हिंदूंना आपल्या वीर  योद्धांचा पराक्रमाचा सत्य इतिहास माहिती व्हावा, गुलामीच्या नव्हे तर शौर्य, पराक्रमाचा इतिहास या पिढीला ज्ञात व्हावा याउद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त शिवराणा भक्त, हिंदु यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन हिंदु सेवा सहाय्य समितीने केले आहे.

सोबत महाराणा प्रतापसिंहजी आणि छ. शिवाजी महाराज यांचे फोटो तसेच प्रमुख वक्ते श्री राजा महाराज शेंडे याचेही फोटो पाठवित आहे कृपया फोटोसह बातमी प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती

Agroindia Writer
Agroindia Writer
Articles: 55

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *